O slideshow foi denunciado.
Seu SlideShare está sendo baixado. ×

कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf

Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Carregando em…3
×

Confira estes a seguir

1 de 4 Anúncio

Mais Conteúdo rRelacionado

Mais recentes (20)

Anúncio

कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf

  1. 1. प्रश्न - क ै सर विलियम द्वितीयच्या परराष्ट्र धोरण याची चर्चा करा? 1. प्रस्तावना : क ै सर विलियम प्रथमच्या मृत्यूनंतर 15 जून 1888 ला क ै सर विलियम द्वितीय हा जर्मनीचा सम्राट झाला. त्याचे चॅन्सलर बिस्मार्क शी जर्मनीच्या ध्येय धोरणांबाबत मतभेद झाले. क ै सर जर्मनीची सर्व सत्ता स्वमर्जीने चालवू इच्छित होता त्यामुळे बिस्मार्क ने 20 मार्च 1890 ला चॅन्सलर पदाचा राजीनामा दिला. परिणामी क ै सरला रान मोकळे मिळाले आणि तो स्वतः जर्मनीच्या परराष्ट्र धोरणाचा कर्ता धर्ता झाला. 1871 ची राजकीय स्थिती "जैसे थे" ठेवणे व जर्मनी एक संतुष्ट राष्ट्र आहे या बिस्मार्क च्या संकल्पना मोडीत काढून क ै सरने विस्तारवादी, आक्रमक परराष्ट्र धोरणाचा पुरस्कार क े ला. त्याच्या कारकीर्दीत क े प्रीव्ही (1890 - 1894), होहेन लोहे (1894 - 1900), पान ब्यूलो (1900 - 1909), व वेथमेन हालवेग (1909 - 1917) असे चार चॅन्सलर झाले. परंतू जर्मनीची सत्ता क ै सरच्याच ताब्यात राहुन तो आपल्या परराष्ट्र धोरणांचा स्वतःच संचालक राहिला. या पार्श्वभूमीवर त्याचे परराष्ट्रधोरण पुढील प्रमाणे. 2. क ै सरच्या परराष्ट्र धोरणाचे उद्देश:- १. जागतिक राजकारणात जर्मनीचे महत्त्व वाढविणे, जर्मनीला जागतिक शक्तीचे स्थान मिळवून देणे" Its destiny was not merely European but word wide". २. वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेला कच्चामाल व हक्काची बाजारपेठ मिळविण्यासाठी वसाहतींच्या क्षेत्रात कठोर धोरण स्वीकारले. ३. पूर्वीय प्रश्नात रुची घेणे, तुर्क स्तानमध्ये जर्मनीचा प्रभाव निर्माण करून भूमध्य सागरात जर्मनीची प्रधानता स्थापित करणे. ४. शक्तिशाली आरमारच नव्या जर्मनीची महानता स्पष्ट करू शकत होते, त्यामुळे विशाल व शक्तिशाली आरमाराची निर्मिती करणे. अशाप्रकारे क ै सर विल्यम द्वितियच्या परराष्ट्र धोरणाचे आरमारी शक्तीत वाढ करणे, राज्य विस्तार करणे हे मुख्य उद्देश्य झाले. जस जसा वेळ जात होता तस तसा तो या उद्देशांना अधिक कठोरपणे वाढवित होता. 3. परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी १. रशियाशी संबंध- रशियन धोरणात बदल: ● रशियाशी मैत्री असताना बाल्कन प्रदेशात जर्मनीस आपले हितसंबंध वाढविता येत नव्हते. ● बिस्मार्क ची जादुगरीपूर्ण परराष्ट्रनिती चालविणे क ै सरला अशक्य असल्याने ऑस्ट्रिया किं वा रशियाची मित्रता स्थापन करणे आवश्यक होते. ● रशियाला औद्योगिक विकासासाठी आर्थिक मदतीची गरज होती व ती जर्मनी देऊ शकत नव्हता. ● या कारणांमुळे रशिया-जर्मनी पुनर्रसंरक्षणाचा करार पुनरुज्जीवीत करणे अशक्य होत होते. त्यामुळे क ै सरने ऑस्ट्रियाशी घनिष्ठ मैत्री जोडली. ● परिणामी रशिया दुखावला जाऊन तो मैत्रीसाठी फ्रान्सकडे वडला. त्यातूनच रशिया- फ्रान्स मैत्री करार झाला.
  2. 2. ● पुढे लिओतुंग द्वीप प्रकरणात क ै सरने रशियाचे समर्थन क े ले त्याचा परिणाम म्हणून जपान जर्मनी विरुद्धच्या इंग्लंड गटामध्ये सामील झाला. ● पुढे रशियाला जपान व इतर देशांनी मांचूरिया खाली करण्यास सांगितले (1901) त्याचे जर्मनीने समर्थन क े ले नाही, तसेच रशिया-जपान युद्धात जर्मनी तटस्थ राहिला. ● ऑस्ट्रियाच्या हर्जेगोविना व बोस्नियाच्या विलीनीकरणास स्थगित करण्याचा रशियाने प्रयत्न क े ला; परंतु त्याचे जर्मनीने समर्थन क े ले नाही. त्यामुळे इंग्लंड, फ्रान्स व रशियात निराशेची भावना पसरली परिणामी इंग्लंड फ्रान्स व रशियातील सबंध अधिक दृढ झाले. २. बाल्कन प्रश्न व क ै सरची भूमिका : ● बाल्कन राज्यातील प्रश्नांमध्ये ऑस्ट्रिया, रशिया आपल्या मित्र राष्ट्रांचे समर्थन करीत होते. ● त्यातील सर्बिया रशियाच्या बाजूचा होता त्यामुळे बाल्कन प्रदेशात आपले प्रभुत्व वाढविण्यासाठी सर्बियाचा विनाश करणे जर्मनीसाठी आवश्यक ठरत असल्याने बाल्कन प्रश्नात क ै सरने आस्ट्रियाचे समर्थन क े ले. परिणामी जर्मनी- रशिया यांच्यातील वितुष्ट वाढत जाऊन त्याची परिमिती पहिल्या महायुद्धात झाली. ३. जर्मनी- इंग्लंड सबंध: ● बिस्मार्क ने इंग्लंडशी कायम मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न क े ला, परंतु विलियम द्वितीयने त्यात बदल क े ला. ● कारण जर्मनीला सर्वोच्च आरमारी शक्ती करण्यासाठी आरमारात वाढ सुरू क े ली. तसेच जर्मनीच्या औद्योगिक विकासाने इंग्लंडच्या व्यापारी प्रधानतेला शह बसू लागला. ● परिणामी इंग्लंडमध्ये जर्मनी विरुद्ध तर जर्मनीत इंग्लंड विरुद्ध जनमत बनू लागले. ● क ै सरने जर्मनीसाठी वसाहती प्राप्त करणे सुरू क े ले. तसेच बाल्कन प्रश्नात रुची घेऊन मध्यपूर्व व तुर्की मधील मुस्लिमांशी मैत्री क े ली. बर्लिन-बगदाद रेल्वे लाईन टाकण्याची घोषणा क े ली. त्यामुळे इंग्लंड -जर्मनी यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले अ. क्र ू गर तार व जेम्सन आक्रमण : ● दक्षिण आफ्रिक े तील ट्रान्सवाल राज्य व ब्रिटिश यांच्यात तणावाचे वातावरण होते. अशातच ब्रिटिश सैन्य अधिकारी जेम्सनने 1896 मध्ये ट्रान्सवाल्वर आक्रमण क े ले. ● परंतु ट्रान्सवालच्या सैन्याने त्याचा पराभव करून तुरुंगात टाकले. तेव्हा क ै सरने ट्रान्सवालचे राष्ट्रपती क्र ू गरला अभिनंदनाची तार पाठविली. त्यात तो लिहितो 'आपण आपल्या मित्रांच्या सहाय्यते शिवाय आपल्या राज्यात पुन्हा शांतता स्थापन करण्यात व लुटारू ं ना बाहेर काढण्यात व आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास सफलता मिळविली आहे'. या तारे विरुद्ध इंग्लंड मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. ● त्यासंबंधी सॅलिसबरी म्हणाला होता, (1899) "आक्रमण एक मूर्खता होती परंतु तार त्यापेक्षाही मोठी मूर्खता होती" तर मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने लिहिले, "इंग्लंड या तारेस कधीही विसरणार नाही व आपली भावी निती ठरवितांना तिला सदैव लक्षात ठेवेल." ब. बोअर युद्ध व क ै सरची भूमिका : ● दक्षिण आफ्रिक े त हॉलंडने ट्रान्सवाल व ऑरेंज फ्री स्टेट वसाहतींची स्थापना क े ली. इथे हॉलंडच्या लोकांना बोअर म्हटल्या गेले.
  3. 3. ● बोअर आपली स्वतंत्रता कायम ठेवू इच्छित होते तर इंग्रज त्यांना आपल्या साम्राज्यात मिळवू इच्छित होते. यात क ै सरची बोअरांना सहानुभूती होती परंतु क ै सरने त्यात हस्तक्षेप क े ला नाही. ● जर्मनी व फ्रान्समध्ये 1894 ला आपसी समझौता होऊन फ्रान्सला काॅंगो व नायजरघाटी येथील वसाहती मिळविण्यासाठी मार्ग उपलब्ध झाला त्याने इंग्लंड अधिकच प्रशुब्ध झाला. ● तसेच क ै सरने चीनमध्ये हस्तक्षेप करून क्यूचौ प्रदेश मिळविला. तसेच बॉक्सर बंड थांबवण्यासाठी एक सेना चिनला पाठविली. ● बर्लिन-बगदाद रेल्वेच्या माध्यमातून आशिया खंडात जागा मिळविण्याचा प्रयत्न क े ला ते इंग्लंडच्या आशियातील साम्राज्यास धोकादायक असल्याने इंग्लंड जर्मनी सबंधातील कठू ता अधिक वाढली. ● पुढे इंग्लंडने मोरोक्को व मिश्रचा प्रश्न फ्रान्सशी समझौता करून मिटविला. तसेच अल्जेसियर्स परिषद व अगाधीर प्रश्नात फ्रांचे समर्थन क े ले. ● परिणामी जर्मनी इंग्लंडमधील संबंध अधिकच विकोपाला गेले. पुढे जर्मनीने बेल्जियमच्या तटस्थतेचे उल्लंघन करून बेल्जियमवर आक्रमण क े ले, तेव्हा बेल्जियमच्या संरक्षणासाठी इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध घोषणा क े ली. ४. जर्मनी तुर्क स्तान सबंध ● क ै सर विलियम द्वितीयने पूर्वेकडील भागात लक्ष घालून तुर्की साम्राज्यात जर्मनीचा प्रभाव वाढविण्यासाठी तुर्क स्तानशी मैत्री सबंध जोडणे सुरू क े ले. त्यानुसार क ै सरने तुर्क स्तानला भेटी दिल्या. ● तुर्की सैनिकांना जर्मनीतर्फे प्रशिक्षण दिले. ● तसेच जर्मनी तुर्क स्तानचा मित्र राहील असे आश्वासनही दिले. त्यातून पुढे बर्लिन-बगदाद रेल्वेची कल्पना उदयास आली. यामागे रशियाला शह देऊन भारतापर्यंत लक्ष घालने हा उद्देश होता. यामुळे इंग्लंडच्या भारतातील साम्राज्याला धोका पोहोचत असल्याने इंग्लंडने त्यास तीव्र विरोध क े ला परिणामी क ै सरणे आपली योजना मागे घेतली. ५. मोरोक्को प्रश्न व क ै सरची भूमिका : ● मोरोक्को आफ्रिक े तील साम्राज्य विस्तारासाठी तसेच आरमारी दृष्ट्या महत्त्वाचा भूभाग होता. ● मोरोक्कोत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी इत्यादी युरोपियन राष्ट्राचे हितसंबंध गुंतले होते. परंतु 1904 च्या इंग्लंड-फ्रान्स मैत्री कराराने फ्रान्सने इंग्लंडच्या इजिप्त मधील तर इंग्लंडने फ्रांसच्या मरोक्कोतील हितसंबंधास मान्यता दिली. ● परिणामी मोरोक्कोतील जर्मनीच्या हितसंबंधांना अडचण निर्माण झाली त्यामुळे क ै सरणे मोरोक्कोला भेट देऊन सुलतानास मदतीचे आश्वासन दिले. तसेच मोरोक्कोतील जर्मनीचे हितसंबंध सुरक्षित राहील असेही स्पष्ट क े ले. ● मोरोक्कोच्या प्रश्नावर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित क े लेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत क ै सरने फ्र ें च परराष्ट्रमंत्री डेलकासी ने राजीनामा द्यावा अशी मागणी क े ली. त्यामुळे संघर्षाची तीन चिन्हे दिसू लागतात डेलकासीने राजीनामा दिला. ● अल्जेसिअर्स परिषदेतील जर्मनीचे धमकी वजा वर्तन पाहून ऑस्ट्रिया सोडून इतरांची सहानुभूती फ्रान्सला मिळाली. मोरोक्कोतील जर्मन हितसंबंध सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले परंतु फ्रांसच्या हक्काला पूर्ण मान्यता दिली. ● पुढे 1911 मध्ये मोरोक्कोत यादवी युद्ध सुरू झाले तेव्हा फ्रान्सने अंतर्गत सुरक्षिततेच्या नावाखाली मोरोक्कोत सैन्य पाठविले. ● तर जर्मनीने पॅंथर नावाचे लढाऊ जहाज मोरोक्कोतील अगादीर बंदरात पाठविले. त्यामुळे पुन्हा युद्ध स्थिती निर्माण झाली परंतु यावेळी इंग्लंड फ्रान्सच्या पाठीशी उभा राहिला.
  4. 4. ● त्यामुळे फ्रान्स व क ै सरला समझौता करावा लागला. त्यानुसार जर्मनीने मोरोक्कोवरील फ्रान्सच्या अधिकारास मान्यता दिली तर फ्रान्सने फ्र ें च कांगोतील प्रदेश जर्मनीला दिला. ● या घटनेनंतर रशिया-फ्रान्स-इंग्लंड यांच्यातील मैत्री अधिक दृढ झाली. तर इंग्लंड-जर्मनी यांच्यातील संबंध बिघडत गेले. 4. क ै सरच्या परराष्ट्र धोरणाचे परिणाम : १. जर्मनीसाठी हानिकारक सिद्ध झाले. २. आरमारी विस्तारामुळे जर्मनी-इंग्लंडमध्ये द्वेष निर्माण होऊन सबंध तणावपूर्ण झाले. ३. जर्मनीने तुर्की मध्ये प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न क े ल्याने इंग्लंड, रशिया जर्मनीवर नाराज झाले. ४. जर्मनीच्या वसाहतवादी धोरणाने जर्मनीचे इंग्लंड व फ्रान्सशी सबंध बिघडले. ५. क ै सर विलियम द्वितीयचे परराष्ट्र धोरण, प्रथम महायुद्धास उत्तरदायी ठरले. ६. युरोपची दोन गटात विभागणी झाली. जर्मनी विरुद्ध इंग्लंड-फ्रान्स-रशिया असा करार अस्तित्वात आला. ७. युरोपचे लष्करी करण होऊन शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण झाली.

×