O slideshow foi denunciado.
Seu SlideShare está sendo baixado. ×

मुघलांचे पतन (1).pdf

Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Anúncio
Carregando em…3
×

Confira estes a seguir

1 de 3 Anúncio

Mais Conteúdo rRelacionado

Mais recentes (20)

Anúncio

मुघलांचे पतन (1).pdf

  1. 1. प्रश्र्न - मुघल साम्राज्याच्या पतनाची कारणे लिहा. प्रस्तावना - पानिपतच्या पहिल्या युद्धात (1526) बाबरने लोदीचा पराभव करून भारतात मुघल सत्तेची स्थापना क े ली. हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब असे प्रभावशाली शासक मुघल सत्तेला मिळाले. परिणामी भारतभर मुघल साम्राज्याचा विस्तार झाला. परंतु प्रकृ तीच्या नियमानुसार उदय, वाढ व लय हा ठरलेला असतो. त्यानुसारच औरंगजेबाच्या शासन काळापासून मुगल सत्तेच्या पतनास सुरुवात झाली व 1761 पर्यंत जवळजवळ शेवट झाला. त्याची कारणे पुढीलप्रमाणे : मुगल साम्राज्याच्या पतनाची कारणे : १. औरंगजेबाचे असहिष्णू धार्मिक धोरण : ● अकबराच्या सहिष्णू व उदारमतवादी धार्मिक धोरणाने मुगलांना संघटित क े ले तर औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणामुळे मुगल साम्राज्याचे विघटन झाले. ● संपूर्ण देशाला सुन्नी पंथीय इस्लाम करण्यासाठी हिंदूंना दुखावलेच नाहीतर आपले विरोधकही क े ले. ● जिझिया कर, मंदिरांचा विध्वंस, बलपूर्वक धर्मपरिवर्तन, प्रशासनात हिंदूंना उच्च पद देणे बंद करणे असे धोरण राबविले. ● परिणामी याविरुद्ध संपूर्ण साम्राज्यात उलट प्रतिक्रिया होऊन हिंदूंच्या व्यापक विरोधाचा सामना मुगलांना करावा लागला. २. औरंगजेबाचे अव्यवहारी दक्षिण धोरण ● औरंगजेबाच्या दक्षिण धोरणाने मुगल सत्तेची मुळे कमक ु वत क े ली. व्यवस्था खिळखिळी झाली. खजिना रिकामा झाला. प्रशासनात अव्यवस्था निर्माण झाली. ● मराठ्यांच्या चिवट विरोधाने शेवटी मुगल साम्राज्य धुळीस मिळविले. त्याबाबत कर लिहितात मुगल साम्राज्य साठी मराठ्यांवरील आक्रमण विनाशक सिद्ध झाले यांच्यासमोर साम्राज्याचे सक्षम व श्रेष्ठतम साधनेही विफल ठरले. ३. औरंगजेबाचे राजपूत विरोधी धोरण ● औरंगजेबाने पूर्वजांच्या राजपूत धोरणात बदल करून राजपुतांशी असहिष्णू धार्मिक धोरणाचा स्वीकार क े ला. ● भारत इस्लाममय करण्यात राजपूत अडथळा ठरत असल्याने त्यांची स्वायत्तता नष्ट करून त्यांचे राज्य मुघल साम्राज्यात विलीन करण्याचा प्रयत्न क े ला. ● त्यामुळे राजपूतांनी दुर्गादास राठोड व अजितसिंह यांच्या नेतृत्वात औरंगजेबाविरुद्ध संघर्ष सुरू क े ला परिणामी मुघलांना राजपुतांचा मिळणारा पाठिंबा बंद झाला त्यामुळे मुघलांची लष्करी शक्ती क्षीण होऊन शेवटी पतन घडून आले. ४. औरंगजेबाच्या हाती सत्तेचे क ें द्रीकरण ● औरंगजेबने राज्याचे सर्व अधिकार व जबाबदारी आपल्याकडेच ठेवली होती. परंतु विशाल साम्राज्य व त्याचे झालेले वय त्यामुळे त्याला साम्राज्यावर नियंत्रण ठेवता आले नाही.
  2. 2. ● औरंगजेबाची प्रांतीय सुभेदारांवरील पकड सैल झाली परिणामी सुभेदाराने क ें द्रीय सत्तेशी संघर्ष सुरू क े ला. ● तसेच अधिकारी वर्गही सांगकाम्या झाला होता. त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या आव्हानात्मक स्थितीचा सामना निर्णय क्षमतेच्या अभावाने त्यांना करता आला नाही. ५. उत्तरकालीन मुगल सम्राट ● औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मुगल सम्राट प्रामुख्याने औरंगाजेबच्या संशयी धोरणामुळे अकार्यक्षम ठरले. ● आपली मुलेही आपल्या विरुद्ध बंड करेल या भीतीने औरंगजेबाने मुलांना लष्करी व प्रशासकीय अनुभव दिला नाही. ● त्यामुळे राज्य संचालनासाठी लागणारी कार्यक्षमता उत्तरकालीन मुगल वारसांमध्ये निर्माण झाली नाही परिणामी मुघल साम्राज्याचे पतन त्यांना थांबविता आले नाही. ६. चारित्रहीन सरदार ● राजा तशी प्रजा या न्यायाप्रमाणे सम्राटांसारखे सरदारही दुर्बल व अकार्यक्षम ठरले. ● सुरुवातीस बहिराम खान, मुनीम खान, महाबतखान, आसफ खान यासारख्या सरदारांनी मुगल साम्राज्य भरभराटीस आणले. ● परंतु उत्तरकालीन सरदार आळशी, विलाशी व भ्रष्टाचारी निघाल्याने त्यांच्याकडून साम्राज्याची योग्य ती सेवा झाली नाही. ७. लष्करी पतन ● औरंगजेबाच्या काळापर्यंत अजय असलेले मुगल लष्कर पुढे दोषपूर्ण संघटन पद्धतीने कमक ु वत झाले. ● मनसबदारी पद्धतीने लष्कराची निष्ठा सम्राटाप्रती न राहता मनसबदारांप्रति राहत असे. सैन्यासाठी मिळणारी मनसब, मनसबदार हडप करीत असल्याने ते लष्कराची परिणामकारक कार्यक्षमता टिकवून ठेवू शकले नाही. ● सरदारांमध्ये परस्पर द्वेष असल्याने ते एकमेकांच्या अपयशासाठी शत्रूलाही मदत करीत असे. परिणामी लष्करी शिस्तीचा अभावामुळे पुढे साम्राज्य सांभाळणे अशक्य झाले. ८. आर्थिक पतन ● बादशाह अकबरने दूरदृष्टीचे आर्थिक धोरण राबवून मोगलांचा खजिना समृद्ध क े ला परिणामी प्रजा सुखी व समाधानी होती. ● पुढे मुगलांनी युद्ध आणि बांधकामांवर अतिरिक्त धन खर्च क े ल्याने प्रजेवरील करांचे प्रमाण वाढवावे लागले. त्यामुळे प्रजा असंतुष्ट झाली. ● पुढे औरंगजेबाने सतत युद्ध क े ल्याने मुगलांचा खजिना पूर्ण रिकामा होऊन साम्राज्याचा आर्थिक पाया ढासळला. धनाअभावी विशाल मुगल साम्राज्य सांभाळणे कठीण होऊ लागल्याने साम्राज्याचे पतन अटळ ठरले. ९. दरबारातील मतभेद ● अकबराच्या काळात दरबारात एकसूत्रता होती परंतु पुढे दरबारात गटबाजी सुरू झाली. ● सुन्नी, शिया, इराणी, हिंदुस्तानी असे मुस्लिमांचे गट पडून त्यांच्यात इर्षा व द्वेष वाढू लागले त्यामुळे ते आपापसात भांडू लागले.
  3. 3. ● सरदारांतील गटबाजीने मुगल साम्राज्यास मदत न करता उलट आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरू क े ला. त्यामुळे क ें द्रीय सत्तेचे पतन होऊ लागले. आणि बंगाल, हैदराबाद, माळवा, गुजरात अशी स्वतंत्र प्रांतीय राज्य उदयास आली. १०. परकीय आक्रमणे ● मुगलांच्या पडत्या काळात नादिरशहा (1739) व अहमदशहा अब्दाली (1741 ते 1761) या परकीय आक्रमकांनी भारतावर आक्रमणे करून मुगलांचा पराभव क े ला. ● प्रचंड कत्तल करून भरमसाठ लूट मिळविली त्यामुळे मुगल सत्तेचे लष्करी व आर्थिक दिवाळे निघाले. परिणामी ही स्थिती बघून अनेक महत्त्वाकांक्षी सरदारांनी प्रांतीय स्तरावर आपापल्या संस्थांची स्थापना क े ली. ११. वारसा हक्काच्या नियमाचा अभाव ● मुस्लिमांमध्ये वारसा हक्काच्या नियमाचा अभाव असल्याने बादशहाच्या मृत्युनंतर किं वा हयातीतही वाट न बघता वारसदारांनांमधे गादीसाठी संघर्ष सुरू होत असे. ● त्या संघर्षामुळे सरदार, दरबार व लष्कराचेही गट पडून त्यांच्यात दोन दोन हात होत असल्याने मुगलांची अतोनात लष्करी हानी होत असे. ● परिणामी लष्करीदृष्ट्या साम्राज्य पोखरले जाऊन त्यांचे पतन अटळ ठरले.

×